Pimpri : धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप बँकेच्या कायदे सल्लागार पदी अॅड मंगेश खराबे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप बँकेची (Pimpri) सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये कायदे सल्लागार पदी वकिलांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यासाठी ॲड. मंगेश खराबे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी आमदार महेश लांडगे ,धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप बँकेचे विद्यमान अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ, पुणे लॉयर्स सोसायटीचे सचिव अॅड अतिश लांडगे, अॅड. संतोष काशीद, बँकेचे सरव्यवस्थापक उपस्थित होते.

Pimpri Chinchwad RTO News : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 18 हजार वाहन चालकांवर आठ कोटींहून अधिक दंड

या नियुक्त्या बँकेच्या वतीने विभागवार करण्यात आल्या आहेत. शिक्रापूर शाखेसाठी ॲड. किरण बापूराव आंबेकर, ॲड. भोलेनाथ लक्ष्मण पडवळ, पिरंगुट शाखेसाठी ॲड. विजयकुमार दत्तात्रय शिंदे, ॲड. समीर निवृत्ती भुंडे, आंबेगाव शाखेसाठी ॲड. संजय बाळासाहेब भालघरे, ॲड. सचिन कुमार अनिल कुमार गेलडा, डीआरटी कोर्टसाठी ॲड. महेंद्र रामचंद्र कुमकर, कासारवाडी शाखेसाठी ॲड. प्रसन्ना गोविंद लोखंडे, ॲड. स्वाती अमोल पावडे यांची (Pimpri) नियुक्ती झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.