Pimpri Chinchwad RTO News : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 18 हजार वाहन चालकांवर आठ कोटींहून अधिक दंड

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन (Pimpri Chinchwad RTO News ) करणाऱ्या 18 हजार 10 वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांवर आठ कोटी 11 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नियोजित कामगिरीपेक्षा अधिकची कामगिरी करण्यात पिंपरी-चिंचवड आरटीओला यश मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवड आरटीओकडून हद्दीतील पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग तसेच इतर प्रमुख मार्गांवर कारवाई केली जाते. सन 2022-23 या वर्षात पिंपरी-चिंचवड आरटीओने आठ कोटी रुपयांच्या दंडाचे लक्ष्य निर्धारित केले होते. मात्र निर्धारित लक्ष्यापेक्षा अधिक कामगिरी करण्यात आरटीओला यश आले आहे.

सन 2022-23 या वर्षभरात पिंपरी-चिंचवड आरटीओने आठ कोटी 11 लाख रुपयांचा दंड आकारून 101.42 टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगात वाहन चालविल्या प्रकरणी सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सात हजार 75 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेल्मेट न वापरणाऱ्या एक हजार 278 वाहन चालकांवर (Pimpri Chinchwad RTO News) कारवाई केली आहे. सीटबेल्ट न वापरणाऱ्या दोन हजार 968 जणांवर कारवाई झाली आहे. महामार्गावरून प्रवास करताना लेन कटिंग करताना योग्य खबरदारी न घेतल्याने अनेक अपघात होतात. त्यामुळे आरटीओ कडून याप्रकरणी देखील कारवाई केली जाते. लेन कटिंग करताना शिस्तीचे, नियमांचे पालन न करणाऱ्या एक हजार 860 जणांवर कारवाई केली आहे.

PCMC : महापालिका महिला बचत गटांमार्फत मालमत्ता कराच्या बिलांचे वाटप करणार

विमा प्रकरणी एक हजार 904, मोबाईल फोनवर बोलत वाहन चालविणे 146, रिफ्लेक्टर दोन हजार 56, वाहन चालविण्याचा परवाना नसणे एक हजार 985, परमिट नसणे 975, फिटनेस नसणे दोन हजार 800, पीयूसी नसणे दोन हजार 25, ओव्हरलोड 421, ओडीसी 97, क्लॅण्डेस्टाईन 249, याव्यतिरिक्त इतर विविध प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.