Pimpri : Pimpri : निरक्षरांच्या सर्वेक्षणावर 982 शिक्षकांचा बहिष्कार

एमपीसी न्यूज –  प्राथमिक शिक्षकांपाठोपाठ आता माध्यमिक शाळांतील शिक्षकांनीही ( Pimpri)  नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार घातला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत 982 प्राथमिक शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. या शिक्षकांनी सर्वेक्षणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

Pimpri : कंट्रोलला फोन अन् अवघ्या काही तासात पोलिसांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शिक्षकांना निवडणूक आणि जनगणना वगळता, अन्य शालाबाह्य कामे देता येत नसल्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यात आहे; तसेच अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनाला वेळ मिळत नसल्याने निरक्षर सर्वेक्षणाचे काम शिक्षकांकडून करून घेण्यात येऊ नये, असे निवेदन प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांनी शिक्षण संचालनालयाच्या योजना विभागाचे संचालक महेश पालकर यांना दिले होते.

यावेळी निरक्षरतेचे प्रमाणाच्या नोंदी करण्यासाठी शिक्षकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकर यांनी केले होते. मात्र, शिक्षकांनी यास नकार देत, या कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. गेल्या दहा वर्षांत शिक्षकांसह कर्मचारी भरती न झाल्याने अनेक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांची कमतरता आहे. उपलब्ध शिक्षकांकडूनच अध्यापनाचे कार्य करून घेतले जात आहे. परिणामी शिक्षकांवर अध्यापनाचा ताण असून, सर्वेक्षणाच्या कामामुळे हा ताण आणखी वाढणार ( Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.