Pune : ‘दृष्टिकोन’ या पुस्तकाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या प्रकाशन

एमपीसी न्यूज –  भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष ( Pune) तथा पुणे शहर प्रभारी माधव भांडारी लिखित  ‘दृष्टिकोन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे संस्कृतीक कार्य मंत्री सुधीर  मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.  स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यसन केंद्र कर्वे रस्ता या ठिकाणी उद्या (दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी) दुपारी 4.00 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

Pimpri : Pimpri : निरक्षरांच्या सर्वेक्षणावर 982 शिक्षकांचा बहिष्कार

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून माधव भांडारी भाजपचे प्रवक्ते म्हणून काम पाहत होते. त्यांनी भक्कमपणे भाजपची बाजू मांडली आहे. त्यांची  अभ्यासपूर्ण वक्ता म्हणून अशी ओळख आहे. त्यामुळे आता त्यांच्या दृष्टिकोन या पुस्तकात नेमके काय लिहिण्यात आले आहे, याची उत्सुकता लागली ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.