Pimpri : मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पिंपरी- चिंचवडकर सज्ज

एमपीसी न्यूज – मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्र सरकार (Pimpri) यांच्यात मराठा आरक्षण प्रश्नी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ठरल्या प्रमाणे पाटील आज शनिवारी आपल्या लाखों मराठा बांधवांसह आंतरवाली सराटी येथून आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले आहेत. त्यांचे उपोषण 26 जानेवारी पासून मुंबईत सुरू होत आहे. मुंबईला जाण्यासाठी पाटील व लाखो आंदोलक येत्या बुधवारी औंध मार्गे सांगवी फाटा येथे शहरात दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पिंपरी- चिंचवडकर सज्ज झाले आहेत.

जगताप डेअरी,काळेवाडी फाटा,डांगे चौक मार्गे चाफेकर चौक,चिंचवड स्टेशन येथे येणार आहेत.तेथून पुढे चिंचवड स्टेशन,आकुर्डी,निगडी,भक्ती शक्ती समुह शिल्प मार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामासाठी जाणार आहेत.सदर पदयात्रा शहरातून सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन,पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन,मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते समन्वयाने नियोजन करत आहे.

Pimpri : राम मंदिर राष्ट्रार्पणानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘रथयात्रा’

शहरातील मराठा बांधव अन्नदान,पाणी वाटप,फळवाटप करून स्वागत करणार आहेत.वारीतील वारकऱ्यांना जसे आपण विविध प्रकारची मदत करतो तशीच मदत अन्नदान,फळे वाटप,पाणी वाटप या प्रकारची मदत पद यात्रा मार्गावर स्टाॅल (Pimpri) उभारून शहरातील विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना,सार्वजनिक मंडळे, दानशूर व्यक्तींनी करावी असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच महानगरपालिकेच्या वतीने फिरते स्वच्छता गृह, पाणीपुरवठा,आरोग्य सुविधा इत्यादी स्वरूपाची मदत करणार आहे.यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे प्रकाश जाधव,सतिश काळे,वैभव जाधव,नकुल भोईर,अरुण पवार,सचिन बारणे,गणेश देवराम,विजय काकडे,राजाभाऊ गोलांडे,राजेंद्र चिंचवडे,विनोद कलाटे,निखिल भंडारे,तुकाराम कलाटे,मनोज मोरे,हरिष मोरे,सुभाष साळुंखे,सागर चिंचवडे,मिरा कदम प्रशांत जाधव,हेमंत गडसिंग,भुपेंद्र गावडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते विशेष परिश्रम करत आहेत.

youtube.com/watch?v=AZq9QmLmZgI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.