Chinchwad : प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी पंधरवडा केला साजरा

एमपीसी न्यूज – चिंचवड (Chinchwad) येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी पंधरवडा साजरा केला. या कार्यक्रमात कर्‍हाड जिल्ह्यातील मल्लवीर खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय क्रिडा दिवस साजरा करण्यात आला. पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयातील क्रिडा संचालक डॉ. पांडुरंग लोहाटे यांनी मल्लवीर खाशाबा जाधव यांचे जीवनचरित्र व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलघडून दाखविले.

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सुवर्णपदक विजेते व प्रशिक्षक विजय टेपुगडे यांनी स्वसंरक्षण व्याख्यान व लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांवर प्रसंगी आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यावर घाबरूण न जाता, धैर्याने स्वसंरक्षण कसे करायचे याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.

स्वसंरक्षणामध्ये महिलांचे सबलीकरण संदर्भात समाजातील समाज कंटकांच्या कोणत्याही हल्ल्याविरोधात महिला स्वताचा बचाव लाठीकाठी प्रशिक्षणातून कसा करू शकते, याचे प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षण दिले.

Pimpri : राम मंदिर राष्ट्रार्पणानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘रथयात्रा’

युवा दिन, मकर संक्रांत व भूगोल दिन साजरा (Chinchwad) करण्यात आला. चिंचवड येथील जैन महाविद्यालय (बी.एड.) प्रा. संभाजी माळी यांचे मार्गदर्शन व व्याख्यान झाले.

विविध कार्यक्रमाचे उद्घाटन कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ.दिपक शहा, प्रा. पोर्णिमा कदम यांच्या तसेच, व्याख्यात्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी समन्वयिका डॉ. सुवर्णा गायकवाड, डॉ. संतोष उमाटे, प्रा. गीता कांबळे, प्रा. मनिषा पाटील, प्रा. सुशिल भोंग, प्रा. अस्मिता यादव आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी भूगोल दिनानिमित्त रांगोळी माध्यमातून आपली कल्पकला सादर केली, विविध कार्यक्रमात आपले सक्रिय सहभाग नोंदवून अंगी असलेले सुप्त कलागुण सादर केले. पंधरावडा विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाहुण्यांची ओळख, आभार विद्यार्थ्यांनी मानले.

youtube.com/watch?v=AZq9QmLmZgI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.