Pimpri : पिंपरी-चिंचवडच्या नागरी समस्या कोण सोडवेल का ? (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- भोंडवे चौक ते वाल्हेकरवाडी रस्ता म्हणजे खड्डे आणि धुळीचे साम्राज्य झाले असून या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चिंचवड पिंपरी लिंक रस्त्यावरील मेट्रोपॉलिटीन गृहसंकुलासमोरील फुटपाथवर गेल्या अनेक महिन्यांपासून भूमिगत इलेक्टिकच्या केबलचा काही भाग उघड पडलेला आहे. त्यामुळे येथून जाणारे वृद्ध नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना त्याचा अडथळा होत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

पिंपरी- चिंचवड लिंक रस्त्यावर अशोक नगर येथे रस्त्यावर बसलेल्या मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याचा संभव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.