Pimpri : फुलांच्या दुनियेत रंगली काव्य मैफल

एमपीसी न्यूज – रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत (Pimpri) कास पठार येथे नुकतीच नक्षत्र कासपठार काव्यसहल संपन्न झाली. विविध सजलेल्या फुलांच्या सानिध्यात भटकंती करण्यात आली. परिसरातील तलाव, हिरवेगार डोंगर, अनेक धरणांचे अथांग पाणी, रिमझिम पाऊसधारा, अतिशय सुंदर हिरवीगर्द झाडी,अनेक रंगीबेरींग फुलांच्या पखरणीने कासपठार फुलेले कवी कवयिञींनी अनुभवले. आणि त्या सृष्टीसौदर्यांने नटलेल्या परिसरात आपली गाणी, शेरोशायरी, कवितांनी या काव्यसहलीत आनंद भरला.

जागतिक दर्जा प्राप्त झालेले हे कास पठार आहे. हा सुंदर फुलांचा परिसर व नैसर्गिक वारसा लाभलेले सौदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. पाऊसाच्या सरी..चवर,पंद,आमरी,सोनकी, तेरडा,गेंद,टुथब्रश,निलिमा आदी विविध जाती प्रजातीच्या फुलांच्या रंगीबेरंगी कळ्या फूलु लागल्या आहेत.

निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले मनमोहक कास पठार अनुभवत सर्व नक्षञ आनंदाने बेभान होऊन जीवनाचा खरा आनंद लुटत होती.

या काव्य सहलीला मार्गदर्शन करण्यासाठी कासपठार पर्यटन कायदे सल्लागार अॅड. संजय माने हे उपस्थित होते. त्यांनी सर्व साहित्यिकांना कासपठाराची व आजुबाजुच्या परीसराची माहिती दिली. या कास पठार नक्षञ काव्यसहलीचे उत्तम नियोजन संयोजन कवी प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.

विशेष संयोजनात अण्णा जोगदंड,सुभाष चव्हाण,अंजू सोनवणे यांनी पुढाकार घेतला. कवींना आदर व सन्मान मिळावा. कविंना (Pimpri) हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणुन संस्था गेली 24 वर्षे कार्य करत आहे.

Chikhali : भंगार खरेदीच्या वादातून भंगार व्यावसायिकाचा खून

या फुलांच्या दुनियेच्या काव्यसहलीत सहभागी झालेले नक्षञ प्रा. शंकर घोरपडे, अण्णा जोगदंड, सुभाष चव्हाण, प्रा.दिलीप गोरे, दिव्या भोसले, अशोक पांढरकर, शिला भुजबळ, अविनाश खेडकर, अंजू सोनवणे, बाळासाहेब पोळ, प्रीती सोनवणे, एम.डी.चौधरी, सुवर्णा मुटके, जयश्री बनकर, सुनील लोंढे, संगीता जोगदंड, स्निधा बॅर्नजी, वैशाली आवताडे, मीना घोरपडे, पूजा आवताडे, सुनंदा चव्हाण , चंद्रकला पोळ, प्राजक्ता पोळ, साईराजे सोनवणे, श्रीकांत जाधव, नंदा चौधरी,अमिता गोरे, श्रध्दा बागडे, कल्पना मुटके, सुमन मुटके, चंदना गायकवाड सह 32 कवी, कवयिञी,र सिक पर्यटकांनी कासपठार नक्षञ काव्यसहलीत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.