Rahatani : खंडणी न दिल्याने बेकरी चालकाला बेदम मारहाण

टोळक्याची रहाटणी परिसरात दहशत

एमपीसी न्यूज –  टोळक्याने एका बेकरीमध्ये (Rahatani) जाऊन खंडणी मागितली. खंडणी न दिल्याने बेकरी चालक व्यक्तीला मारहाण केली. त्यानंतर आम्ही रहाटणीचे भाई आहोत. आम्हाला हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत हवेत कोयते फिरवत दहशत निर्माण करून टोळके पळून गेले. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री साडेआठ वाजता रहाटणी मधील जय भवानी चौकातील बेस्ट बेकरीमध्ये घडली.

मोहम्मद उजैका अब्दुल मलिक अन्सारी (वय 20, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पवन महादेव जाधव (वय 21, रा. रहाटणी. मूळ रा. बुलढाणा), रोहित राहुल शिंदे (वय 19, रा. रहाटणी), माऊली उपाले (वय 20) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या बेकरीमध्ये काम करत असताना आरोपी बेकरीमध्ये येऊन शिवीगाळ (Rahatani) करू लागले. आरोपींनी फिर्यादीकडे हप्त्यापोटी दोन हजार रुपयांची मागणी केली. हप्ता न दिल्याने आरोपींनी फिर्यादीस कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला.

Pimpri : फुलांच्या दुनियेत रंगली काव्य मैफल

फिर्यादींनी कोयत्याचा वार चुकवला. हे भांडण पाहून बेकरी मधील ग्राहक पळून गेले. आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ केली. बेकरी मधील साहित्याचे नुकसान केले. ‘तुला खूप चरबी आहे का, तुला म्हटले होते ना आम्ही रहाटणीचे भाई आहोत. आम्हाला हप्ता द्यावा लागेल. आम्ही उद्या पुन्हा येऊ. हप्ता दिला नाही तर कापून टाकू’ अशी धमकी दिली.

बेकरीच्या बाहेर मोठ्याने आरडाओरडा करत हवेत कोयते फिरवून आरोपींनी दहशत निर्माण केली. पोलिसांनी पवन जाधव आणि रोहित शिंदे या दोघांना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.