Pimpri News : सोमवारी महापालिकेच्या 68 केंद्रांवर लसीकरण सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि. 30) कोविड 19 लसीकरण सुरु आहे. महापालिकेच्या 68 केंद्रांवर लाभार्थ्यांना लस मिळणार आहे.

सोमवारी कोविशिल्ड या लसीचा 18 वर्षांवरील सर्व लाभार्थींना 60 केंद्रांवर पहिला आणि दुसरा डोस मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत 10 ऑगस्टपासून प्रामुख्याने वॉर्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीद्वारे लसीकरण केले जात आहे. KIOSK मशीनद्वारे घेतलेल्या टोकननुसार आणि महापालिकेमार्फत एसएमएस संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना 60 केंद्रांवर लस मिळणार आहे.

सोमवारी कोव्हॅक्सीन लसीचा वय 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना फक्त दुसरा डोस आठ केंद्रांवर मिळणार आहे. शहरातील आठ केंद्रांवर सोमवारी स्तनदा व गरोदर महिलांचे लसीकरण करण्यासाठी काही डोस शिल्लक ठेवण्यात आले आहेत.

लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत करण्यात येईल. कोविड अॅपवर नोंदणी करण्यासाठी सोमवारी सकाळी आठ वाजता स्लॉट, बुकिंग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.