Pimpri Corona Update : शहरात आज 178  नवीन रुग्णांची नोंद; 187 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध भागात 178 नवीन कोरोना (Pimpri Corona Update) बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 187 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 66 हजार 179 जणांना आजपर्यंत कोरोनाची (Pimpri Corona Update) लागण झाली. सध्या 1 हजार 309 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 299 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Praful Patel : ईडीने केली प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त

तर, 10 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 2 हजार 641 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 92 हजार 632 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.