Praful Patel : ईडीने केली प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक,अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल  (Prafula Patel) यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक आणि आता प्रफुल्ल पटेल यांच्यावरसुध्दा ईडीने कारवाई केली. ईडीची कारवाई होणारे पटेल हे तिसरे नेते आहेत.

 

 

इक्बाल मिर्ची प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॅट खरेदी प्रकरणी मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान ईडीने केलेल्या कारवाईत पटेल यांचे वरळी येथील घर जप्त करण्यात आले आहे.इक्बाल मिर्ची प्रकरणात मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात आली आहे.

 

 

Chikhali News : देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पोस्ट ऑफिस’ आपल्या दारी उपक्रम

 

 

पटेल यांचं घर असलेली बिल्डींग डीएचएफएलकडून डेव्हलप करण्यात आले होते. दरम्यान पटेल आणि त्यांचं कुटुंब हे प्लॅट सध्या वापरु शकणार आहेत.मात्र त्यांची विक्री ईडीच्या परवानगीशिवाय त्यांना करता येणार नाही. इक्बाल मिर्ची याने हा फ्लॅट खरेदी केला होता आणि त्यानंतर हा एका डेव्हलपरने तो डेव्हलप केल्यानंतर यातले काही फ्लॅट पटेल यांना विकले. या व्यवहारात मनी लॅंड्रींग करण्यात आल्याचा आरोप आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.