President Election : द्रौपदी मुर्मू बनल्या नव्या राष्ट्रपती

एमपीसी न्यूज – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. युपीएचे उमेदवार यशवंश सिन्हा यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. मतमोजणी आधीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. कारण भाजपने या निवडणुकीत (President Election) द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चेबांधणी केली होती. 15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 21 जुलैला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या.

द्रौपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 खासदारांची मते मिळाली तर यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मतं मिळाली. मुर्मू यांना पहिल्या फेरीत मिळालेल्या मतांचं मूल्य 3 लाख 78 हजार तर यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांच मूल्य 1 लाख 45 हजार इतक होत.दरम्यान, पहिल्या फेरीत 15 मत रद्द झाली.

 

 

Praful Patel : ईडीने केली प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त

 

मुर्मू यांना दुसऱ्या फेरीतील मतमोजणीतही घवघवीत मतं (President Election) मिळाली. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या दहा राज्यांची मतमोजणी करण्यात आली. त्यापैकी द्रौपदी मुर्मू यांना 1349  मतदान झालं.

त्या मतांच मूल्य 483299  इतकं आहे. तर यशवंत सिन्हा यांना मतांची (President Election) मूल्यही 179876  इतक ठरलं. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी 18 जुलैला मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.