Pimpri : कोरोनामुळे वैधव्य आलेल्या महिलांचे पालिका करणार समुपदेशन

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पतीचे निधन झाल़्याने वैधव्य आलेल्या महिलांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने समुपदेशन करण्यात येणार आहे.

त्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘उमेद जागर’ हा उपक्रम क्षेत्रीय स्तरावर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “उमेद जागर उपक्रमाअंतर्गत महिलांचे समुपदेशन करणे, विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधणे तसेच कौशल्य विकास वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण देणे व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे. ”

नागरवस्ती विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उमेद जागर’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन व अंमलबजावणी नागरवस्ती विभागामार्फत करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.