Pimpri corona update : पिंपरी चिंचवड शहरात आज नवीन 857 रुग्ण; एकूण संख्या 43 हजार 374

आजपर्यंत एकूण 29 हजार 733 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (मंगळवारी, दि. 25) 857 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 43 हजार 374 झाली आहे. 23 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1 हजार 158 जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 6 हजार 123 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मंगळवारी 1 हजार 158 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 29 हजार 733 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज मृत झालेले रुग्ण चिंचवड (पुरुष 59 वर्ष, पुरुष 69 वर्ष, पुरुष 69 वर्ष), रहाटणी (पुरुष 43 वर्ष, स्त्री 24 वर्ष), सांगवी (पुरुष 75 वर्ष, स्त्री 65 वर्ष), वाल्हेकरवाडी (पुरुष 75 वर्ष), चिखली (पुरुष 62 वर्ष, पुरुष 48 वर्ष), किवळे (पुरुष 64 वर्ष) निगडी (स्त्री 50 वर्ष, पुरुष 77 वर्ष), मोशी (पुरुष 65 वर्ष), काळेवाडी (स्त्री 60 वर्ष, स्त्री 60 वर्ष, पुरुष 75 वर्ष), भोसरी (पुरुष 48 वर्ष), पिंपळे सौदागर (पुरुष 55 वर्ष) च-होली (स्त्री 80 वर्ष) देहुगाव (पुरुष 49 वर्ष), देहुरोड (स्त्री 65 वर्ष), मंचर (स्त्री 55 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 29 रुग्णांचे आज निदान झाले. सध्या 661 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 169 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 141 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी 18 हजार 105 घरांना पालिकेच्या वैद्यकीय विभागाने भेट दिली. त्यातील 57 हजार 609 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.