Pimpri corona Update : पॉझिटिव्ह न्यूज ! शहरात कोरोनाचा आज एकही मृत्यू नाही

127 नवीन रुग्णांची नोंद, 129 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले असून ही दिलासादायक बाब आहे. शहरात आज, मंगळवारी कोरोनाचा एकही मृत्यू झाला नाही, हेही आशादायक चित्र आहे.

शहराच्या विविध भागातील 127 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 129 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 95 हजार 563 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 92 हजार 83 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1737 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 714 अशा 2451 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 752 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1042 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.