Pimpri crime News : अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक

एमपीसी न्यूज – मॉलच्या गेटजवळ खेळात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला मॉलच्या सुरक्षारक्षकाने त्याच्या केबिनमध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. याबाबत सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी साडेअकरा वाजता डिलक्स मॉल, पिंपरी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

रवींद्र केशवराव चव्हाण (वय 57, रा. पिंपरीगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास पिंपरी येथील डिलक्स मॉलच्या मागील गेटजवळ खेळत होती. आरोपी रवींद्र हा त्या मॉलच्या गेटवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला त्याच्या केबिनमध्ये नेऊन तिथे तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.