Pimpri : शहरात दुर्गोत्सवातून घडतेय बंगालचे ‘दर्शन’(व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – शंखनाद, ढोलचा निनाद , अशा मंगलमय वातावरणात बंगाली बांधवांच्या दुर्गापूजा उत्सवाला सुरूवात झाली. पाच दिवस चालणारा हा सण आज (सोमवार) अष्टमीपासून सुरू झाला असून दशमीपर्यंत चालणार आहे. दुर्गा मूर्ती स्थापनेचा मुहूर्त सकाळीच असल्याने सकाळपासूनच बंगाली पद्धतीच्या पूजाअर्चेनेने शहरात नवरात्रीचा आनंद द्विगुणीत केला.

बंगाली बांधवाचे विविध धार्मिक कार्यक्रम दि. 15 ते 19 ऑक्टोबर या दरम्यान मासुळकर कॉलनी येथील रंगास्वामी पेरुमल पिल्ले सांस्कृतिक भवनात झाला. बंग भारतीतर्फ कार्यक्रम होणार आहेत. बंग भारती दुर्गापूजा आणि काली पूजा कमिटीच्यावतीने दरवर्षी हा दुर्गोत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवाचे उदघाटन अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या धार्मिक कार्यक्रमांमध्ये षष्ठी, सप्तमी, महाअष्टमी, महानवमी, दशमी पूजा दररोज सकाळी होणार आहेत त्याशिवाय दि. 15 ते 18 दरम्यान दररोज रात्री साडेसात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दि. 15 तारखेला सायंकाळी साडेसात वाजता दुर्गा पूजा कार्यक्रमाचे उदघाटन होईल. दि. 16 ते 18 दरम्यान दुपारी एक ते तीन या वेळेत भोग प्रसादाचे वाटप व रात्री सातला आरती होईल. दि. 19 ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता सिंदूर उत्सव होईल.

महाराष्ट्रात जसे 10 दिवस घट बसतात. तसे बंगाली बांधवांच्या घरात किंवा सार्वजनिक मंडळात शष्टमिला दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यानुसार आज सकाळी दुर्गा प्रतिष्ठापना करण्यात आली. दुर्गा देवी ही बंगाली बांधवांची कन्या मानली जाते. त्यामुळे ती पाच दिवस माहेरवाशीन म्हणून येते. त्यावेळी तिच्याबरोबर गणपती, कार्तीकेय, लक्ष्मी आणि सरस्वतीही येतात. पाच दिवसाच्या वास्तव्यानंतर ती दशमीला (दसरा) परत जाते, अशी अख्यायिका आहे.

याबाबात माहिती बंग भारतीच्या दुर्गा आणि काली पूजा समितीचे अध्यक्ष पी. के. भट्टाचार्य म्हणाले, वास्तविक दुर्गापूजा ही एप्रिल महिन्यात असते. आम्ही त्याला ‘बासी दुर्गापूजा’ म्हणतो. परंतु रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाला दुर्गादेवीने दर्शन दिले होते. तोच आजचा दिवस, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे आजपासून पाच दिवस आम्ही दुर्गोत्सव साजरा करतो. अष्टमीला देवी बसते तर दशमीला विसर्जन होते. यादरम्यान महाअष्टमी संपताना व महानवमीच्या सुरूवातीच्या आधी ‘संधीपूजा’ केली जाते.

कार्यक्रमाचे संयोजन बंग भारती दुर्गा पुजाचे समितीचे अध्यक्ष सुब्रतो मुजुमदार, राहुल चौधरी, बाप्पा मुजुमदार, एस. के. सेन, पी. के. भट्टाचार्य, प्रताप सरकार, संदीप रॉय आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.