Pimpri : विहिरीत पडलेल्या गाईला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

एमपीसी न्यूज – विहिरीत पडलेल्या गाईला (Pimpri) अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढत जीवदान दिले. सोमवारी (दि. 11) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास वल्लभनगर पिंपरी येथे ही घटना घडली.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जाधव यांनी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला माहिती दिली की, वल्लभनगर येथील शंकरवाडी महादेव मंदिराच्या जवळ एका विहिरीमध्ये गाय पडली आहे. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्रातून एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

Alandi : श्री भैरवनाथ महाराज उत्सवा निमित्त संदलाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने संपन्न

विहिरीमध्ये दहा ते पंधरा फूट खोल गाय पडली (Pimpri) होती. जवानांनी तातडीने एक जेसीबी बोलावला. घटनास्थळी जेसीबी येण्याकरिता पुरेशी जागा नव्हती. तरीदेखील जेसीबी चालकाने कौशल्याने मार्ग काढून विहिरीपर्यंत जेसीबी आणला. रेस्क्यू बेल्टच्या मदतीने गाईला विहिरीतून सुखरूपपणे वर काढण्यात आले. वेळीच मदत मिळाल्याने गाईचे प्राण वाचवण्यात जवानांना यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.