Pimpri : महापालिका शाळेतील 1296 विद्यार्थी आणि पालकांचा उन्नतीकडून मोफत अपघाती विमा

एमपीसी  न्यूज – उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने पिंपळे सौदागर येथील महापालिकेची आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील  1296 विद्यार्थी आणि प्रत्येकी एक पालक यांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. सुमारे 38 कोटी 88 लाख रुपये एवढा विमा संरक्षण लाभ घेता येणार आहे. अपघाती विमा पॉलिसी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांच्याकडे उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे यांनी उस्फूर्त केले. 
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकास काटे, आनंद हास्य क्लबचे सचिव राजेंद्र जयस्वाल , कांचन काटे, सुवर्ण काटे, विवेक भिसे , यश राक्षे, गजानन देसाई  तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक आदी उपस्थित होते. 

यावेळी विध्यार्थ्याना मार्गदर्शन करताना कुंदा भिसे म्हणाल्या,  महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची परिस्थिती बेताची असते. तसेच अनेक पालकांचा कोणत्याही प्रकारचा विमा किंवा मेडिक्लेम नसतो . त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला तर पालकांना हजारो रुयांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातील सर्वच शाळांनी विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढणे काळाची गरज आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने यासाठी प्रयत्न करावेत. या अपघाती विम्यात विद्यार्थ्यांना अपघात झाला तर25 हजार  रुपये रुग्णालयातील खर्च मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास पालकांना एक लाख तर पालकांचा मृत्यू झाल्यास त्या पाल्यावर शिक्षणापासून वंचित राहू येऊ नये म्हणून त्या पाल्यास 2 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच पिंपळे सौदागर मधील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना अपघाती विमा देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे शहरातील महापालिका शाळेसह खाजगी शाळा चालकांनी देखील अशा अपघाती विमा करणे काळाची गरज आहे . शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता इसकांडे आणि माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे आणि सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले. 

आर.एच.डी. हेल्थकेअरच्या संचालिका म्हणाल्या, सध्या राज्यासह देशात अपघाती विमा करणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत. मात्र हि एकमेव कंपनी अशी आहे कि, सर्वसामान्य माणसाला परवडेल आशा आर्थिक बजेटमध्ये अनेक सुविधा देण्यात येत आहेत , यात नर्स  आणि रुग्णवाहिका, आरोग्य तपासणी, प्रथम उपचार ,यासह अनेक सुविधा देण्यात येणार असल्याने नागरिकांनी देखील हा अपघाती विमा करावा.  
     
कार्यक्रमाची प्रास्ताविक आण्णासाहेब मगर माध्यमिक विदयालयातील शिक्षिका कविता चव्हाण यांनी केले, अंकुश इंगवले यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.