Pimpri : हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

 एमपीसी न्यूज –  हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या माजी ( Pimpri ) विद्यार्थ्यांचा मेळावा हॉटेल कलासागर पिंपरी मध्ये संपन्न झाला. शाळेतील सन 1990 च्या मराठी माध्यमाच्या बॅचने परीक्षेनंतर 34 वर्षांनी एकत्र येत विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा केला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुनील रिकामे,उमेश सुरवाडे,विजय प्रगणे,अनिस नदाफ, शरीफ शेख ,मीना सूर्यवंशी,परवीन दलाल कल्याणी कल्याणी प्रभुणे आदी उपस्थित होते. तसेच तत्कालीन एनसीसी ऑफिसर  व निवृत्त माजी उप मुख्याध्यापक पांडूळे सर उपस्थित होते.

Alandi : ह भ प डॉ नारायण जाधव यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान

सर्वप्रथम उमेश सुरवाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील रिकामे यांनी पुणेरी पगडी व शाल श्रीफळ देऊन सरांचा सत्कार केला. भूषण ओझर्डे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळा, कॉलनी, एच ए कंपनी यांच्याविषयी सद्भावना व कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. एकत्रीतपणे घालवलेले आनंदाचे व काही खडतर क्षण देखील त्यांनी बोलून दाखवले. या आनंदाची शिदोरी व पुढच्या भेटीची ओढ कायम ठेवून सर्वांनी निरोप घेतला. जेवणाबरोबर एकत्रित  नाच गाणी, दांडीया यामध्ये प्रमुख पाहुण्य़ांसह सर्वांनी सहभाग ( Pimpri ) नोंदवला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.