Sharad Pawar : नव्या राजकीय भूकंपाची शक्यता …. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार ?

एमपीसी न्यूज –  नवा  राजकीय भूकंप होण्याची ( Sharad Pawar) शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात दररोज  मोठ्या घडामोडी  होत  आहे .  पुण्यात  शरद पवार गटाची महत्वाची बैठक सुरू असून शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Pimpri : हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची बैठक आज पुण्यात चालू आहे. पक्षाचे सर्व आमदार, खासदार या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत शरद पवार हे सर्व नेते, आमदार व खासदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता  ( Sharad Pawar) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.