Pimpri : सावरकर दौड ने होणार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिन सप्ताहाची सुरुवात

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था ( Pimpri ) आयोजित “सावरकर आत्मार्पण सप्ताह प्रारंभ निमित्त” पिंपरी-चिंचवड शहरात 25 फेब्रुवारी रोजी सावरकर दौड चे आयोजन करण्यात आले आहे. या दौडने शहरात सावरकर आत्मार्पण दिन सप्ताहाची सुरुवात होणार आहे.

भक्ती-शक्ती  ते सावरकर उद्यान (गणेश तलाव जवळ), निगडी या मार्गावर सकाळी साडे सात ते साडे दहा या वेळेत “सावरकर दौड” हा कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केलेले आहे.

Sharad Pawar : नव्या राजकीय भूकंपाची शक्यता …. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार ?

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलजी देवधर  तर उद्घाटक म्हणून आमदार महेश दादा लांडगे, अनुप मोरे, अतुल इनामदार हे उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच सावरकरांची नात असीलता सावरकर , नातू सात्यकी सावरकर, सावरकर अभ्यासक व अभिनेते योगेश सोमण , निर्माते दिगपाल लांजेकर, रेगे चित्रपट फेम आरोह वेलणकर लेखिका आणि संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ. शुभा साठे आदी उपस्थित राहणार आहेत.

या दौडमध्ये शहरातील काही शाळा देखील होणार सहभागी होणार असून, 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा होणार उत्फुर्त सहभाग, विद्यार्थ्यांबरोबर पालक आणि शिक्षकांची देखील उपस्थिती असणार आहे. शहरातील विविध संस्था आणि सर्व वयोगटातील स्त्री पुरुष यांना सहभागी करून घेणार संस्कृतभाषा शिकवून  संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या शिक्षकांचा  सन्मान होणार आहे. संस्थेचा महाराष्ट्रातील विविध शहरातील नवनिर्वाचित सदस्यांचा पद वितरणसोहळा देखील पार पडणार आहे.

या दौडमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांना https://forms.gle/azZnecAiF3qYTstr9 या लिंकवर फॉर्म भरता येणार आहे.तसेच व अधिक माहितीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास विजय कुलकर्णी 9561491625 यांना संपर्क साधता येणार ( Pimpri ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.