Pimpri : आंतरराष्ट्रीय संस्था सिफाचे सिंगापूर येथे उदघाटन

एमपीसी न्यूज – आयुर्वेदाचा प्रसार जगभर व्हावा, यासाठी शिव इंटरनॅशनल फ्रेटरनिटी ऑफ आयुर्वेदा (सिफा) या संस्थेची स्थापना नुकतीच करण्यात आली.

या संस्थेचे उदघाटन सिंगापूर येथील सेंगकॉग स्क्वेअर याठिकाणी करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन नामंकित कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. लेसली टे व बिंदू जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या डॉ. शिल्पा स्वार, डॉ. पुष्कर प्रभु, नामंकित कार्डिओ लॉजिस्ट डॉ. लेसली टे, केरला आयुर्वेदिक कंपनीतील प्रमुख चिकित्सक डॉ. बिंदू जोशी आदी उपस्थित होते. तसेच सिफाच्या वेबसाईटचे उदघाटनही सिंगापूरमधील केडीट स्विस कंपनीचे उपाध्यक्ष विश्राम स्वार यांच्या हस्ते करण्यात आले.

  • यावेळी डॉ. लेसली टे म्हणाले, शास्त्र कोणतेही असो ते जर मानवाच्या हितासाठी वापरले जाणार असेल तर ते अवश्य वापरावे, भारताबाहेर आयुर्वेद आणि योगा या गोष्टींविषयी खूप एकायला मिळते आहे. याचा उपयोग जगातील लोकांना व्हायला हवा.

त्यानंतर डॉ. बिंदु जोशी म्हणाल्या, आमची कंपनी ब-याच दिवसांपासून येथे काम करत आहे. परंतु जनसामान्य लोकांना आयुर्वेद फारसा माहित नाही. सिफाने एक नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्याने खरा आयुर्वेद भारताच्या बाहेर लोकांना माहित होईल, असा मला विश्वास आहे.
त्यानंतर डॉ. स्वार म्हणाल्या, सिंगापूर येथे जगभरांतून लोक विविध कामांसाठी येत असतात. त्यामुळे जगभरात आयुर्वेद पोहोचवायाचा असल्यास आयुर्वेद सिंगापूरात पोहोचायला हवा.

  • यानंतर सिंगापूर येथील नागरिकांसाठी लहान मुलांचे आरोग्य, स्मरणशक्ती आणि एकाग्रता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या विषयावर डॉ. पुष्कर प्रभु यांनी संवाद साधला, अशी माहिती डॉ. मिलिंद सैद-पाटील व डॉ. उदय जोशी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.