Pimpri : इलेक्ट्रिक बाईक क्षेत्रातील अग्रगण्य नाव ‘तुनवाल ई-मोटर्स’ची इलेक्ट्रिक व्हेईकल एक्स्पोमध्ये दमदार कामगिरी

प्रत्येक वयोगटातील ग्राहकांच्या गरजा किफायती दरात पूर्ण करण्यास 'तुनवाल ई-मोटर्स' कटिबद्ध

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिक दुचाकींच्या क्षेत्रात (Pimpri)अग्रगण्य नाव असलेल्या ‘तुनवाल ई-मोटर्स’ने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुसज्ज, सुरक्षित आणि इको-फ्रेंडली ई-बाईक्स ‘पुणे इलेक्ट्रिक व्हेईकल एक्स्पो’मध्ये सादर केल्या. प्रत्येक वयोगटातील ग्राहकांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या एक ना दोन तब्बल 14 व्हेईकल्स या प्रदर्शनात सादर करण्यात आल्या. तुनवाल ई-मोटर्सचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना परवडेल अशा दरात आणि विशेष सवलतीसह सेवा; हे होय.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, विद्यार्थी, महिला, (Pimpri)दिव्यांग अशा विविध घटकांचा सूक्ष्म विचार करून तुनवाल मोटर्सने आधुनिक पद्धतीच्या इलेक्ट्रिक बाईक्स लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या खिशाला परवडतील अशा ई-बाईक्स बुक करण्यासाठी ग्राहकांनी चिंचवड मधील ऑटो क्लस्टर येथे झालेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल एक्स्पोमध्ये गर्दी केली.

विविध आकाराच्या 14 प्रकारच्या आकर्षक ई बाईक्स मॉडेल तुनवाल मोटर्सने तयार केल्या आहेत. ग्रामीण भागासह शहरातील विद्यार्थी, व्यावसायिक, प्रोफेशनल्स, महिला, दिव्यांग, डिलेव्हरी बॉय, जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा, वेग, आकार यामुळे तुनवाल ई-मोटर्स व्हेईकल्स अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

विविध वयोगटातील व्यक्तींचा विचार करून या बाईक्स तयार करण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त, चालकांच्या सोयीनुसार कमी-जास्त वेग निश्चित करण्याची सुविधा यामध्ये आहे. आकर्षक लूक, इतर ई- बाईक्सच्या तुलनेत स्वस्त आणि परवडणारी किंमत, कमीत कमी विद्युत उर्जेवर जास्तीत जास्त अंतर धावण्याची क्षमता, बॅटरीचे दीर्घकाळ आयुष्य, झीरो साऊंड, आरामदायी बैठक व्यवस्था, पैशांची बचत अशी अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण या ई-व्हेईकल्स आहेत.

Talavade : तळवडे आग दुर्घटना; जखमी रुग्ण आणि नातेवाईकांच्या सर्वतोपरी मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा मदत कक्ष

तुनवाल ई-मोटर्स’च्या ग्राहकांना बाईक खरेदीवर आकर्षक सवलत व खरेदी संबंधीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच लोन, ईएमआयची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना बाईक खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. ई-बाईक्सच्या क्षेत्रात नव्याने व्यावसाय करू इच्छिना-या लोकांना डीलरशिप देण्यात येत आहे. त्यासाठी बाईक्सच्या क्षेत्रात व्यवसायिक होण्याची संधी तुनवाल ई-मोटर्स’ उपलब्ध करून देत आहे. ग्राहक आणि डीलरशिपसाठी इच्छुक व्यक्तींनी 91 7559182533, 91 8448448763 या क्रमांकावर संपर्क करावा, अशी माहिती तुनवाल ई-मोटर्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. झुमरमल तुनवाल यांनी दिली.

पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबीशन सेंटर येथे झालेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल एक्स्पोमध्ये तुनवाल ई-मोटर्सने उत्तम प्रदर्शन केल्याने ग्राहकांनी विशेष पसंती दिली. ग्राहकांच्या प्रेमापोटी तुनवाल ई-मोटर्सकडून देखील या एक्स्पोमध्ये बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सवलत देण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.