Chhattisgarh CM: छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णुदेव साय होणार

एमपीसी न्यूज : छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून विष्णुदेव साय (Chhattisgarh CM)यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राज्य भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक झाली त्यात विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

भाजपचे निरीक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल , (Chhattisgarh CM)दुष्यन्त गौतम यांनी आज दुपारी रायपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली. छत्तीसगडचे भाजपचे प्रभारी ओम माथूर हे या बैठकीत उपस्थित होते . या बैठकीत आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Talavade : तळवडे आग दुर्घटना; जखमी रुग्ण आणि नातेवाईकांच्या सर्वतोपरी मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा मदत कक्ष

विष्णुदेव साय हे 2009आणि2014 मध्ये रायपूरचे खासदार होते. 2023 मध्ये त्यांची भाजप राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.