Talavade : तळवडे आग दुर्घटना; जखमी रुग्ण आणि नातेवाईकांच्या सर्वतोपरी मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा मदत कक्ष

एमपीसी न्यूज – तळवडे येथे झालेल्या आग दुर्घटनेत (Talavade)नऊ कामगार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर सात जखमींवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने 24 तास एक मदत कक्ष स्थापन केला आहे.
शुक्रवारी (दि. 8) दुपारी तळवडे येथील स्पार्कलिंग कँडल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. इथे झालेल्या स्फोटात सहा कामगार महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले. त्यातील दोन महिलांचा शनिवारी तर एका महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य सात जणांवर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या (Talavade)कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. जखमी कामगारांच्या उपचारात कोणतीही कमतरता येऊ नये. त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार व्हावेत आणि नातेवाईकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वैद्यकीय अधिकारी आणि दोन मदतनीस यांचा मदत कक्ष ससून रुग्णालयात नेमला आहे. यातील सर्वजण 24 तास रुग्णालयात उपस्थित राहून जखमींच्या नातेवाईकांना मदत करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.