Talegaon Dabhade : माळवाडी येथील कानिफनाथ मंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – माळवाडी येथील सुप्रसिद्ध कानिफनाथ मंदिराच्या (Talegaon Dabhade)सभामंडपाचे लोकार्पण संपन्न झाले. आमदार सुनील शेळके यांच्या निधीतून या सभामंडपाचे काम करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, प्रसिद्ध किर्तनकार महेश हरवणे उपस्थित होते.

Alandi : माऊली मंदिरात संजीवन समाधी उत्सवा निमित्त फुलसजावटीच्या कामात कामगार मग्न

या प्रसंगी बोलताना सुनील शेळके म्हणाले,मावळ तालुक्याला (Talegaon Dabhade)वारकरी संप्रदायाचा वसा व वारसा आहे. संतांचे विचार हेच मानवजातीला तारुण नेणार आहेत. मंदिरांमुळेच गावातील वातावरण सात्त्विक व  चांगले राहाते.या प्रसंगी माळवाडी गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,गावातील प्रतिष्ठीत नागरिक,महिला भगिनी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.