Alandi : माऊली मंदिरात संजीवन समाधी उत्सवा निमित्त फुलसजावटीच्या कामात कामगार मग्न

एमपीसी न्यूज – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सवा (Alandi)निमित्त माऊली मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने कामगार वेग वेगळ्या फुलांचा व साहित्यांचा वापर करत आकर्षक सजावटीच्या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहेत.


कार्तिक वद्य 13/14 त्रयोदशी वार सोमवार दिनांक 11 रोजी पहाटे 3 ते 4 पवमान अभिषेक व दुधारती(Alandi)(प्रमुख विश्वस्त संस्थान),सकाळी 5 ते 9: 30 श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा,सकाळी 7ते 9 हैबतबाबा पायरी पुढे कीर्तन (ह भ प हैबतबाबा आरफळकर),सकाळी 7 ते 9 विणा मंडपा मध्ये कीर्तन संस्थान,सकाळी 7 ते 9 भोजलींग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडी यांचे कीर्तन,सकाळी 9 ते 11 भोजलींग काका मंडप येथे दाणेवाले निकम दिंडी यांचे कीर्तन,सकाळी 9 ते 12 ह भ प नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन संपन्न होणार आहे.

Chakan : कांद्याच्या दरात एक हजारांची घसरण

दुपारी 12 ते 12:30 संजीवन समाधी दिनानिमित्ताने घंटा नाद ,पुष्पवृष्टी व आरती संपन्न होईल.मान्यवरांना नारळ प्रसाद देण्यात येणार असून दुपारी 12:30 ते 1 श्रींना महानैवेद्य, सायंकाळी 6:30 ते 8:30 विणा मंडपात ह भ प सोपान काका देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.रात्री 8:30 ते 9 धुपारती(संस्थान),रात्री 9:30 ते 11:30 कारंजा मंडपा मध्ये भजन(हरिभाऊ बागडे व पंढरी केसरकर) ,रात्री 12 ते 4 जागर (हैबतरावबाबा आरफळकर) होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.