Talwade : तळवडे आग दुर्घटनेच्या ठिकाणी नीलम गोऱ्हे यांची भेट

एमपीसी न्यूज – तळवडे येथील शिवराज इंटरप्राईजेस या ( Talwade ) कारखान्यामध्ये झालेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटना स्थळाची पाहणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. रविवारी (दि. 10) दुपारी गोऱ्हे यांनी तळवडे येथील कारखान्यात उपस्थित राहून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

शुक्रवारी (दि. 8) दुपारी तळवडे येथील स्पार्कलिंग कँडल बनवणाऱ्या शिवराज इंटरप्राईजेस या कारखान्यात भीषण आग लागली. इथे झालेल्या स्फोटात सहा कामगार महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले. त्यातील दोन महिलांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य आठ जणांवर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Chakan : कांद्याच्या दरात एक हजारांची घसरण

दरम्यान, गोऱ्हे यांनी शनिवारी ससून रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची विचारपूस केली. तसेच कामगारांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता येऊ नये, याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. तळवडे येथील या दुर्घटना स्थळाची डॉ. गोऱ्हे यांनी रविवारी दुपारी पाहणी केली.

यावेळी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, यांच्यासह पालिका, तहसीलदार उपस्थित ( Talwade ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.