Talavade : शहरातील उद्योगांत वापरल्या जाणाऱ्या घातक पदार्थांची तात्काळ माहिती घ्या – डॉ. नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील आग दुर्घटना स्थळाची केली पाहणी

एमपीसी न्यूज – धोकादायक आणि घातक पदार्थांमुळे (Talavade)अपघात होऊ शकतो अशा पदार्थांचा वापर आणि साठा करणाऱ्या पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योग व्यवसायांची तात्काळ माहिती संकलित करा, औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिले.

 

पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथील (Talavade)कारखान्यात झालेल्या दुर्घटना स्थळाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक केशव घोळवे, शांताराम भालेकर, पंकज भालेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उप आयुक्त मनोज लोणकर, सहायक आयुक्त सीताराम बहुरे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, औद्योगिक सुरक्षा संचलनालयचे संचालक देवीदास गोरे, सहसंचालक अखिल घोगरे, उपसंचालक योगेश पतंगे, तहसीलदार अर्चना निकम, पोलीस उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट आदी उपस्थित होते.

Talegaon Dabhade : माळवाडी येथील कानिफनाथ मंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण

श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, तळवडे येथे घडलेली आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेतील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे त्या म्हणाल्या. कामगारांची सुरक्षा हा महत्त्वाचा प्रश्न असून औद्योगिक क्षेत्रात काम करणा-या सर्व कामगारांसाठी सुरक्षात्मक उपाययोजना असणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अग्नि सुरक्षा सर्वेक्षण सुरू आहे.

पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असून धोकेदायक परिस्थितीमध्ये तसेच स्फोटकांचा वापर करणा-या उद्योगांची माहिती संकलित करण्याचे काम तातडीने पुर्ण करावे, अशा सूचना डॉ. गो-हे यांनी दिल्या. औद्योगीक क्षेत्रात सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी औद्योगिक आस्थापनांना निर्देश द्यावेत, असे देखील डॉ. गो-हे यांनी यावेळी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.