Pimpri : कासारसाई व पिंपरी येथील अमानवी घटनेच्या विरोधात मनसेचे प्रतीकात्मक फाशी आंदोलन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – कासारसाई व पिंपरी येथे लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आज मनसेच्या वतीने पिंपरीत आरोपींच्या पुतळ्याला प्रतीकात्मक फाशी देण्यात आली.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सचिव राजू सावळे, रुपेश पटेकर, दत्ता देवतरसे, हेमंत डांगे, उपशहराध्यक्ष चंद्रकांत दानवले, भोसरी विधानसभा अध्यक्ष विशाल मानकरी, अंकुश तापकीर, महिला सेनेच्या आश्विनी बांगर, विभाग अध्यक्षा अनिता पांचाळ आदी उपस्थित होते.

भाजपा सरकारच्या काळात देशातील व राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, मुख्यमंत्र्याचा पोलीस प्रशासनावर कोणताही वचक राहिलेला नाही अशी टीका सचिन चिखले यांनी केली. या गुन्ह्यातील नराधमांना त्वरित अटक करून खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.अशी मागणी यावेळी कऱण्यात आली.

https://www.youtube.com/watch?v=sAoxnnE3Gsg&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.