Pimpri : कासारसाई व पिंपरी बलात्कार घटनेच्या निषेधार्थ आंदोलन (व्हिडिओ )

एमपीसी न्यूज – कासारसाई व पिंपरी येथे लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आज पिंपरीत स्वराज अभियान आणि शेकापच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्वराज अभियानाचे अध्यक्ष मानव कांबळे आणि शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अत्याचार, बलात्कार, खून, विनयभंग, राजरोजपणे होत असून अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करणाऱ्या नराधमांना कायद्याची भीती राहिलेली दिसून येत नाही. आरोपींना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

https://www.youtube.com/watch?v=TOAOcdCOHR0&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.