Pune : जलस्त्रोत संरक्षित करण्याचा नवा भूजल कायदा – 2018 सर्वंकष हवा

संस्था, कार्यकर्त्यांची पत्रकार परिषदेत मागणी

एमपीसी न्यूज- नैसर्गिक जलस्त्रोत संरक्षित करण्याचा नवा भूजल कायदा -२०१८ सर्वंकष हवा, त्यात नागरिक, संस्था, कार्यकर्त्यांनी मांडलेली मते सरकारने विचारात घ्यावी अशी मागणी विविध जलमित्र संघटनांच्या प्रतिनिधींनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.

या पत्रकार परिषदेला शैलेंद्र पटेल (‘जल देवता सेवा अभियान), रवींद्र सिन्हा (भूजल अभियान) आणि दीपक श्रोते (‘रामनदी स्वच्छता अभियान’), ललीत राठी (समग्र नदी परिवार), पुष्कर कुलकर्णी (वसुंधरा स्वच्छता अभियान) उपस्थित होते. या नव्या कायद्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. संस्था, नागरिक, तज्ज्ञांच्या सूचना मागवल्या आहेत. ३० सप्टेबर २०१८ अंतिम तारीख आहे. आतापर्यंत पुण्यातून २ हजार सूचना सरकारपर्यंत गेल्या आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नागरिक, संस्थांनी सूचना पुढील इमेल, पत्त्यावर कळवाव्यात- जलदेवता सेवा अभियान- अतिरिक्त मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि जलनिःसारण विभाग महाराष्ट्र राज्य, जी. टी हॉस्पिटल बिल्डिंग, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई -०१, इमेल [email protected]

या बाबत राज्य सरकारची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अजून सुनावणीची प्रक्रिया बाकी आहे. नवा कायदा सक्षम, परिपूर्ण, सर्वंकष असावा आणि लोकसहभागाच्या दृष्टीने सुलभ असावा, कारण आताच एखादा जलस्त्रोत वाचवायचा झाल्यास सरकारी यंत्रणांकडून त्याचे नकाशे, नोंदी, कागद मिळत नाहीत. जलस्त्रोत वाचवण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत नाही. राम नदी, बावधन झरा, नासिक, आळंदी येथील कुंडातील जलस्त्रोत पुनरुज्ज्वीत करताना आलेल्या अडचणींची माहिती यावेळी देण्यात आली.

पुरातन नैसर्गिक विहिरी, तलाव, ओढे, नाले ,नदी यांच्या नैसर्गिक जागेची लांबी रुंदी नैसर्गिकरित्या अबाधित होत्या, पण कदाचित प्रत्यक्ष जलसाठ्याचे अधोरेखित नकाशे अपूर्ण किंवा उपलब्ध होत नसल्यामुळे म्हणून अतिक्रमण करून जमीन, रस्ता,घर नाहीसे करता आले. त्यामुळे आजपर्यंत जलयुक्त शिवार अंतर्गत जनसहभागाने स्वतःचा वेळ व पैसे खर्चून अप्रतिम जलसंसाधनाचे कार्य केले आहे. ते कार्य पुढच्या पिढीसाठी टिकून संरक्षित राहण्यासाठी त्या कार्याचे जागेचे लांबी रुंदीचे नकाशे सरकारी दप्तरी अधोरेखित करून जनतेसाठी उपलब्ध व्हावेत म्हणजे अतिक्रमण होऊन नामशेष होणार नाहीत, असे यावेळी सांगण्यात आले.

सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार ‘आंतरराष्ट्रीय नदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जलस्त्रोत वाचविण्यात यावे असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले. गंगा की अविरलतासाठी १०० दिवसापासून उपोषण करणाऱ्या स्वामी सानंदजींना आपला सहभाग नोंदवण्यासाठी एक दिवसीय मुळा, मुठा, राम नदीवर उपोषण करण्यात येणार आहे.

भारतातील सर्व नदया प्रमाणे आम्ही सुद्धा रामनदी प्रदूषण मुक्त अविरल वाहत राहावी या साठी बावधन येथील रामनदी जवळील विठ्ठल मंदिर व कॉर्पोरेशन शाळेजवळ रविवार दिनांक 30 सप्टेंबर 18 रोजी सकाळी 9 ते 5 एक दिवसीय उपोषण करणार आहोत तरी त्या मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.