Pune : पोलीस आयुक्तालयातील जनरेटरला आग

एमपीसी न्यूज- पुणे पोलीस आयुक्तालयातील एका जनरेटरला आज दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे आयुक्तालयात सगळ्यांचीच धावपळ उडाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.