Pimpri : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची गणेश मंडळांना भेटी

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri) सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या. मंडळांच्या गणपतीच्या आरत्या त्यांच्या हस्ते झाल्या. सायंकाळी सहा वाजल्यापासून मंडळ भेटीच्या त्यांच्या दौ-याला सुरुवात झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात लक्ष घातले आहे. या आठवड्यात दोनवेळात ते शहरात आले आहेत. पहिल्यांदाच यंदा शहरातील गणेश मंडळांना रोहित पवार भेटी देत आहेत. सायंकाळी सहा वाजता चिंचवड गावातील मंडळांच्या गणपती आरतीने त्यांच्या भेटी गाठीला सुरुवात झाली.

रावेत, पिंपरीगाव, सांगवी, दापोडी, वाकड भागातील मंडळांना त्यांनी दिल्या. त्यांच्या हस्ते मंडळाच्या आरत्या करण्यात आल्या. शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, प्रवक्ते माधव पाटील आदी उपस्थित होते.

Supriya Sule : लोकशाहीमधील विरोधी पक्षांची, विरोधी विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही

दरम्यान, पक्षातील फुटीनंतर पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटही प्रयत्नशिल आहेत. शहरावर (Pimpri) अजित पवार यांचे वर्चस्व आहे. शहरातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, दोन माजी नगरसेवक वगळता सर्वजण अजितदादांसोबत आहेत.

शरद पवार यांच्यासोबत केवळ दोन माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे शहरात संघटना वाढविण्याची जबाबदारी रोहित पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी रोहित हे सातत्याने पिंपरी-चिंचवडच्या दौ-यावर येताना दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.