Pune Rain : पुणे शहराला पावसाने झोडपले; तर आळंदीत पावसामुळे विसर्जनासाठी नागरिकांची नाराजी

एमपीसी न्यूज : राज्यातील अनेक भागात (Pune Rain) जोरदार पावसाने हजेरी लावली असून पुणे शहराला आज दुपारपासून चांगलेच झोडपून काढले आहे. तर पुढील सहा दिवस पुणे शहर आणि आसपासच्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मागील अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली होती. पण आज पुणे शहर आणि आसपासच्या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांना त्यामधून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात दिवसभर पावसाचा संततधार

तर, 24 ते 29 सप्टेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत पुणे शहर आणि आसपासच्या भागात हलक्या ते स्वरूपाचा पाऊस (Pune Rain) पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागा मार्फत करण्यात आले आहे.

आळंदीत संततधार पाऊस – 

आळंदी शहरातही सायंकाळी संततधार पाऊस चालू होता. आज गौरी विसर्जना नंतर बहुत करून नागरिक संध्याकाळी शहरातील विविध देखावे पाहण्यास पसंती देतात. परंतु, संध्याकाळी चालू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

तर शेतीसाठी शाळू इतर पिकांसाठी हा पाऊस लाभ दायी ठरणार आहे. तरी पुढील शेतातील पिकांसाठी तसेच तलाव, विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी व ओढे नाले पाण्याच्या प्रवाहाने वाहण्यासाठी अजून खूप मोठ्या पावसाची आवश्यकता दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.