Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात दिवसभर पावसाचा संततधार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात (Chinchwad) शनिवारी (दि. 23) दिवसभर संततधार पाऊस बरसात राहिला. गौरी विसर्जनानंतर अनेकजण शहरभर फिरून गणेश मंडळांनी केलेले देखावे पाहण्यासाठी पसंती देतात. मात्र गौरी विसर्जनाच्या दिवशी आलेल्या पावसाने सगळ्यांचा हिरमूड केला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे. पुणे जिल्ह्यात पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यातच परतीच्या पावसाला सुरुवात झाली असल्याने पुणे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

शनिवारी गौरी विसर्जन झाले. गौरी विसर्जन झाल्यानंतर अनेक महिला (Chinchwad) गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतात. त्यातच यावर्षी गौरी विसर्जनानंतर रविवार आल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे अनेकांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत गणेश देखावे पाहण्याचे नियोजन केले होते. मात्र, दिवसभर सुरू असलेल्या पावसाने त्यांच्या नियोजनावर पाणी फेरले गेले.

Bhosari : समाविष्ट गावांतील वीज ग्राहकांना दिलासा, महावितरणच्या आकुर्डी, भोसरी विभागाचे होणार विभाजन

शहरात सध्या गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. त्यातच राजकीय मंडळी देखील गणेशोत्सव मंडळांना भेटी देत आहेत. शनिवारी आलेल्या पावसामुळे या राजकीय मंडळींच्या गणेशोत्सव मंडळांच्या भेटीच्या दौऱ्यावर देखील काहीसा परिणाम झाल्याचे दिसले. अनेक मंडळांपुढे केवळ देखावे सुरू होते. मात्र ते पाहण्यासाठी नागरिक नसल्याची अवस्था पाहायला मिळाली.

पिंपरी चिंचवडसह मावळ परिसरात देखील शनिवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. यामुळे पवना धरणाची पातळी वाढून नदीमध्ये विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले अथवा झाडे पडल्याच्या घटना घडलेल्या नाहीत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.