Pimple Saudagar : लिनिअर गार्डन येथील जॉगिंग ट्रॅक झाले मिनी स्विमिंग पूल, नागरिक फुटपाथवर करतात व्यायाम

एमपीसी न्यूज : महापालिकेने स्मार्ट सिटी (Pimple Saudagar) अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पिंपळे सौदागर येथे लिनिअर गार्डन उभारले आहे. आकर्षक व निसर्गरम्य उभारण्यात आलेल्या लिनिअर गार्डनकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने जॉगिंग ट्रॅकवर अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाऊस पडल्याने त्या खड्ड्याचे मिनी स्विमिंग पूल झाले आहे. त्यामुळे नागरिकांना सायकल ट्रॅक व फुटपाथवर व्यायाम करावा लागत आहे.

दीड किलोमीटरपेक्षा अधिक लांब असलेल्या लिनियर गार्डनमध्ये नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विविध वृक्षांची लागवड देखील करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी खेळण्या, नागरिकांसाठी ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी हिरवळ यासह ठिकठिकाणी बसण्यासाठी दगडी कट्टा देखील बांधण्यात आले आहेत.

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात दिवसभर पावसाचा संततधार

उद्यानातील लहान मुलांच्या बहुतांश खेळण्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. तसेच ओपन जिमचे साहित्य अनेक दिवसांपासून मोडले असून त्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच मरीन ड्राईव्ह सदृश्य आकाराच्या लिनिअर उद्यानात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना रात्री रोषणाई देण्यासाठी लावण्यात आलेले स्मार्टसिटी नामक दिवे देखील नादुरुस्त अवस्थेत असल्याचे दिसत आहे.

लिनिअर गार्डनच्या कम्पाउंडवर (Pimple Saudagar) अनधिकृतपणे फ्लेक्स, किऑस्क लावल्यामुळे उद्यानाचे विद्रुपीकरण होत असल्याचे नागरिक सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.