Pimpri : न्यायाधीशांची संख्या वाढविणे गरजेचे – न्यायाधीश एस.बी.अगरवाल

जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस बी अगरवाल यांची पिंपरी न्यायालयास भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात असणा-या न्यायालतील न्यायाधीशांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे न्यायाधीशांना जागा उपलब्ध करून त्यांच्या नियुक्तीची आवश्यकता असल्याचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस बी अगरवाल म्हणाले.

मुख्य न्यायाधीश एस बी अगरवाल यांनी मंगळवारी (दि. 18) पिंपरी न्यायालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी न्यायालयातील मुख्य न्यायाधीश के एम पिंगळे, ए यु सुपेकर, एन टी भोसले, एस जी आगरवाल तसेच पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड . सुनील कडुसकर, उपाध्यक्ष ऍड . योगेश थंबा, सचिव ऍड . गोरख कुंभार, सहसचिव ऍड . अंकुश एम. गोयल, खजिनदार संतोष मोरे, ऑडीटर ऍड . महेश टेमगिरे, सदस्य ऍड . पुनम राउत, ऍड . निलेश ठोकळ, ऍड . विकास बाबर, ऍड.केशव घोगरे, ऍड मोनिका सचवाणी, ऍड . फ्रान्सीस भोसले, ऍड . अनिल सेजवानी, बारचे माजी अध्यक्ष ऍड . सुहास पडवळ, ऍड . सतीश गोरडे, ऍड . विलास कुटे, ऍड . सुनील कड, ऍड . सुदाम साने, ऍड . पद्मावती पाटील, ऍड . दीपा कदम, ऍड . गणेश राउत, ऍड . दिलीप शिंगोटे, ऍड .बाळासाहेब रणपिसे, ऍड . प्रसन्ना लोखंडे, ऍड. बी. के. कांबळे आदी उपस्थित होते.

मुख्य न्यायाधीश एस बी आगरवाल यांनी पिंपरी न्यायालयातील कामकाज आणि अडचणी यांची माहिती घेतली. पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी चिंचवड न्यायालयात अनेक समस्या आहेत. तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध झालेल्या नेहरू नगर येथील महापालिकेच्या इमारती मध्ये पिंपरी येथील न्यायालय तातडीने स्थलांतरित होणे अत्यंत आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.