Lonavala :लोणावळ्याजवळ भंगार गोदामाला भीषण आग

एमपीसी न्यूज : लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाका येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भंगार दुकानाला आज दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास शाॅर्ट सर्किटमुळे भीषण  आग लागली .

 

भंगार गोदामासह परिसरातील दुकाने जळून खाक झाली. प्रचंड मोठ्या प्रमाणात आगीचे लोट व धुरांचे डोंब हवेत गेल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती समजताच आयआरबी व लोणावळा नगरपरिषद यांच्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु असून घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी जमली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.