Lonavala : लोणावळा धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज : आज दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान लोणावळा (Lonavala)धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग मित्र रेस्क्यु पथकाला यश आले आहे. पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.

विवेक छत्री ( वय 21, रा. ओळकाईवाडी), करण कुंवर (वय 20, या. ओळकाईवाडी) अशी या पाण्यात बुडून मयत झालेल्या मुलांची नावे आहेत.

Pune :पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

धरणात मुले बुडाल्याची माहिती समजताच शिवदुर्ग चे अजय शेलार, महेश म्हसणे, (Lonavala)सागर कुंभार, मनोहर ढाकोळ, राजेंद्र कडू, प्रणय अंबुरे, अनिल आंद्रे, चंद्रकांत बोंबले, अमोल परचंड, अनिकेत आंबेकर, अमोल सुतार, दक्ष काटकर, आयुष वर्तक, दुर्वेश साठे, महादेव भवर, रतन सिंह, अशोक उंबरे, सुनील गायकवाड, ब्रिजेश ठाकुर, मयुर दळवी, साहिल भिकोले, निहाल दळवी, आकाश घरदाळे, कैलास दाभणे, दिंपाशु तिवारी यांच्या पथकाने टाटा धरणाच्या मुले बुडल्याच्या ठिकाणी जाऊन पाण्यात तात्काळ शोध मोहीम राबवत मुलांना बाहेर काढले. मात्र नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजतात लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल व पोलीस पथक देखील दाखल झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.