Pimpri News: पिंपरी चिंचवड शहर पोलीस भरतीसाठी 15 हजार अर्ज

एमपीसी न्यूज – राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील भरती उशिराने सुरु होणार आहे. जानेवारी अखेरीस ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. शहर पोलीस दलात 216 जागांसाठी तब्बल 15 हजार 147 उमेदवारांनी (Pimpri News)अर्ज केले आहेत. त्यातच दोन तृतीयपंथीयांचे देखील अर्ज आहेत.तर महिलांसाठी 65 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Pune News : राज्य पोलीस भरतीसाठी साडेसहा लाख पदवीधरांनी केले अर्ज

पोलीस भरती जाहीर झाल्यानंतर तृतीयपंथीयांना देखील भरतीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे जाहीर झालेली भरती स्थगित करून पुन्हा नव्याने भरतीचे आदेश काढण्यात आले. तृतीयपंथी देखील पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील भरतीसाठी दोन तृतीयपंथीयांनी देखील अर्ज केले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी आयुक्तालयांतर्गत भरारी पथके तसेच दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून भरती प्रक्रियेवर वाॅच राहणार आहे. मैदानी चाचणी तसेच लेखी परिक्षेत काही गैरप्रकार होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे.

या भरती पक्रियेमधील पहिला टप्पा असणारी मैदानी चाचणी 30  जानेवारी पासून सुरू होणार आहे. त्यासाठी आयुक्तालयातर्फे युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवर्गानुसार भरल्या जाणाऱ्या जागा
खुला                     119
इडब्ल्यूएस              14
इतर मागासवर्ग        61
विशेष मागास प्रवर्ग    9
भटक्या जमाती (ब)    8
अनुसूचित जाती        5

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.