Pimpri News : शहरात विनामास्क फिरणा-या 41 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विनामास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी (दि.03) शहराच्या विविध भागात विनामास्क फिरणा-या 41 जणांवर कारवाई करण्यात आली.

विनामास्क कारवाईत भोसरी एमआयडीसी 01, आळंदी 02, सांगवी 01, वाकड 10, हिंजवडी 08, रावेत चौक 09, आणि म्हाळुंगे चौकी 10 अशी कारवाई करण्यात आली.

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेबाबत सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. केरळमध्ये कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढत असून दररोज तीस हजारांच्या घरात रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे लस घेतली तरी मास्क परिधान करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे विषाणू आणि कारवाई पासून वाचण्यासाठी मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.