Pune News : आंबिल ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणात विकासक आणि प्रशासनाकडून दिशाभूल

एमपीसी न्यूज – आंबिल ओढा झोपडपट्टी कारवाई प्रकरण राज्यात गाजत असताना माहिती आधिकारातून अजून एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

पुणे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनाकडून मिळालेल्या पत्रानुसार सदर आंबिल ओढा फायनल प्लॉट २८ ही जागा आजही पुणे महापालिकेच्या मालकीची असून सदर जागा कोणत्याही विकसकाला हस्तांतरीत केली नसल्याने अटी शर्ती अथवा मोजणी करीता परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे नमूद केले आहे. मात्र, बिल्डरने थेट झोपडपट्टी पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूमी अभिलेख विभागाची दिशाभूल करुन शासकिय मोजणी ‘क’  केली आहे.

बिल्डर केदार आसोसिएटस तर्फे सूर्यकांत ऊर्फ बाळासाहेब निकम व झोपडपट्टी पुनर्वसनच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूमी अभिलेख क्र१ विभागाची दिशाभूल करुन दिनांक १९/४/२०१८ रोजी शासकिय मोजणीची ‘क’ पर्यंत केली गेली आहे. तसेच दिनांक १/१०/२०२०रोजी प्राथमिक पात्रता यादीचे झोपडपट्टी पुनर्वसनच्या वतीने संकर्षण आधिकारी क्रमांक ३ यांनी काढलेल्या पत्रकात जमिनीची मालकी हक्क प्राप्त आसलेल्या सस्थेचे नाव मे. केदार आसोसिएटस असे घोषित केले आहे. अशाप्रकारे संबधित बाब महापालिकेच्या सर्व आधिकाऱ्यांना ज्ञात असून देखिल तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची कोणतीही नियमावली न पाळता स्थानिक झोपडपट्टीवासियांना दडपशाही व कारवाईचा धाक दाखवून विस्थापित करण्याचा प्रकार सातत्याने चालू आहे.

पुणे महापालिका न्यायलयाच्या आदेशाप्रमाणे प्रशासन व झोपडपट्टी धारकांनी सहमतीने चर्चा केली व झोपडपट्टीवासियांच्या मागणीचे निवेदन सादर केले असताना देखील आज (शनिवार दिनांक 4 सप्टेंबर) शासकीय सुट्टी असताना देखील उपयुक्त पुणे महापालिका सक्षम अधिकारी अविनाश सपकाळ, क्षेत्रीय अधिकारी अविनाश महादळकर, कार्यकारी अभियंता काशिनाथ गांगुर्डे, चाळविभागाचे राकेश विटकर व इतर अधिकारी वर्ग स्थानिक आंबिल ओढा झोपडपट्टीधारकांना आयुक्तांच्या नावे कारवाईचा बडगा दाखवून धमकवत होते. अशा प्रकारे पुणे महापालिका झोपडपट्टी पुनर्वसन आणि विकासक यांच्या संगनमताने कायद्याची पायमल्ली करत आहेत, ती थांबवावी, असे सांगत आंदोलन करण्याचा पवित्रा स्थानिक रहिवाशांसह बहुजन एकता परिषदने दिला असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.