Pimpri News : अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक – उल्हास जगताप

एमपीसी न्यूज : न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष ,दानशूर आणि मुत्सद्दी राज्यकर्त्या म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक आहे, (Pimpri News) असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या मोरवाडी चौक तसेच सांगवी येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.(Pimpri News) सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, उप आयुक्त रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आयुक्त वामन नेमाने, राजेश आगळे, कार्यकारी अभियंता विजय भोजने, प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते दिपक भोजने, नारायण राहिंज, गणेश एकल, विजय महानोर, धनंजय जोशी आदी उपस्थित होते.

Talegaon Murder Case : तळेगाव येथील महिलेच्या खूनाची उकल, चार आरोपी अटकेत

सांगवी येथील कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, दिलीप धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते मनोजकुमार मारकड, सुर्यकांत गोफणे, बाबासाहेब चिथळकर, सुधाकर सुर्यवंशी, अभिमन्यु गाडेकर,तुकाराम पाटील,कृष्णराव गर्गुने, मधुकर लंभते, छगन वाघमोडे, नवनाथ भिडे, देवकाते सर उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी कुशल प्रशासक म्हणून राज्य कारभार केला.  अनिष्ट रुढी प्रथेविरुध्द लढा देऊन आदर्शवत राज्य कारभार करणा-या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,(Pimpri News) असे सांगून देशभरात लोकोपयोगी सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांनी केलेल्या महान समाजकार्याचा वारसा सर्वांनी जोपासावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.