Punawale : पुणे बंगळूर हायवेवर झालेल्या भीषण अपघातामुळे वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज : पुणे बंगळूर हायवेवर झालेल्या भीषण अपघातामुळे दुपारी अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. त्याची अधिक माहिती देताना, सुनील पिंजन (पोलीस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग) म्हणाले, की ” रस्त्याचे काम चालू असल्यामुळे साताऱ्याच्या दिशेने जाणारा ट्रॅक्टरचा वेग कमी झाला होता. त्याला मागून डंपरने जोरदार धडक दिली. ज्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली उलटी झाली. हा अपघात आज दुपारी अंदाजे तीन वाजताच्या सुमारास झाला होता. त्यामुळे साताऱ्याकडे जाणारी वाहतूक (Punawale) बंद झाली होती.

Alandi Ganeshotsav : यंदाच्या निर्बंधमुक्त गणेशोत्सवासाठी आळंदीत जय्यत तयारी सुरु

जखमी विषयी विचारले असता (Punawale) पिंजण म्हणाले की, “एकाला पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत, तर दुसरा किरकोळ जखमी आहे. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी प्रथम ट्रॅक्टर ट्रॉली हटवली व एक लेनवरून गाड्यांची वाहतूक सुरू केली. थोड्या वेळानंतर डंपर सुद्धा हटवून सर्व दोन लेन वाहतुकीस खुली झाली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी पोलिसांना अर्धा तास लागला.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.