Alandi Ganeshotsav : यंदाच्या निर्बंधमुक्त गणेशोत्सवासाठी आळंदीत जय्यत तयारी सुरु

एमपीसी न्यूज : मागील दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र शासनाचे नियम व अटी यांचे निर्बंध असल्याने सार्वजनिक रीत्या मोठ्या उत्साहात गणेशोत्सव (Alandi Ganeshotsav) साजरा करण्यात आला नव्हता. मागील दोन वर्षात शासनाचे नियम अटी निर्बंधामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात एक गाव एक गणपती संकल्पना आणली गेली होती. यंदा मात्र शासनाचे त्यासंदर्भात कुठलेही निर्बंध नसल्याने आळंदी शहरात मोठ्या उत्साहात विविध सार्वजनिक ठिकाणी विविध मंडळे मंडप बांधणी व देखावे निर्मितीसाठी तयारीला लागले आहेत.

गणरायाच्या आगमनासाठी अवघे चार दिवस उरल्याने त्या उत्सवाच्या रूपरेषांसंदर्भात मंडळाची आखणी चालू आहे. मंडप उभारणी पासून ते अगदी देखावे, सजावटीपर्यंतच्या संदर्भात बैठका, चर्चा सुरू झाल्या आहेत. आळंदी शहरातील बहुतेक सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मुर्ती विक्रेत्यांकडे गणेश मूर्ती बुकिंग करून ठेवल्या आहेत. तर, काही मंडळे गणेशोत्सव निमित्त पारंपरिक ढोल ताशे वाद्यांचा सराव करत आहेत.

Talegaon Murder Case : तळेगाव येथील महिलेच्या खूनाची उकल, चार आरोपी अटकेत

दत्त मंदिर, वडगांव चौक, नगरपालिका चौक, माऊली मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील घुंडरे आळी, चाकण चौक, गोपाळपुरा, मरकळ चौक, पद्मावती रस्ता येथे असणारी मंडळे यावर्षी (Alandi Ganeshotsav) कोणते देखावे करणार? याकडे आळंदीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.