Pimpri News: शहर काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारी यांना च्यवनप्राश देणार – डॉ. कैलास कदम

एमपीसी न्यूज : आज पिंपरी येथे शिवस्मारक या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी (Pimpri News) शिवाजी महाराजांच्या प्रति केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा तसेच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. तसेच भाजप आणि राज्यपालांच्या विरोधात तसेच त्रिवेदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित आंदोलकांनी निषेधाची भाषणे केली. या सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम होते. ते याप्रसंगी म्हणाले, “वारंवार पुरोगामी महाराष्ट्राची ओळख प्राप्त करून दिलेल्या महापुरुषांचा अवमान आणि इतिहासाची मोडतोड करून चुकीची वक्तव्य केली जात आहेत. यामुळे समाजामध्ये आराजक माजण्याची स्थिती आहे, राज्यपाल या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीची वक्तव्य करणे गैर आहे. अतिशय चुकीचा संदेश या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या अशा वक्तव्यातून नागरिकांमध्ये जाऊन असंतोष निर्माण होत आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

Alandi News : महिला पोलिसामसवेत गैरवर्तन करत विनयभंग करणारे अटकेत

वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांची या महाराष्ट्राच्या (Pimpri News) कणाकणावर कर्तुत्वाची छाप आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत, त्यांचा इतिहास हा कालबाह्य होऊ शकत नाही, तर तो मागील सर्व पिढ्यांना व येणाऱ्या सर्व पिढ्यांना कायम प्रेरित करत राहील. मात्र, कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याची कीव येते. त्यांच्या बुद्धीवरच प्रश्नचिन्ह उभा राहिल, असे वक्तव्य त्यांनी स्वतःच केलेले आहे.

त्याचबरोबर त्रिवेदी याच्या व्यक्तव्याने छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट सावरकरांशी करून स्वतःच्या अकलेचे तारे तोडले आहेत. छत्रपती शिवरायांचा इतिहास हा पराक्रम, शौर्य, नीती, समता व न्याय या सर्व बाबींवर आधारित असताना सावरकरांची त्यांची तुलना करणे हे गैर आहे आणि अशा पद्धतीची वक्तव्य करणे म्हणजे शिवरायांच्या प्रति अवमान केल्यासारखे होईल. त्यामुळे त्या विधानाचा देखील मी निषेध करत आहे. भाजपच्या नेत्यांना योग्य बुद्धिमत्तेची प्रचिती यावी, स्मरणशक्ती वाढावी, बुद्धी कौशल्य वाढावे, यासाठी पिंपरी चिंचवड (Pimpri News) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने राज्यपाल कौशल यांना च्यवनप्राश पाठवण्यात येणार आहेत, असे कदम म्हणाले.

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, सेवा दलाचे शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष विजय ओव्हाळ, डॉ. मनीषा गरुड, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, अर्जुन लांडगे, उमेश बनसोडे, तारिक रिजवी, अबूबकर लांडगे, बाबा बनसोडे, मिलिंद फडतरे, नितीन खोजेकर, वसंत वावरे, सतीश भोसले, किरण नढे, रोहित भाट आदीसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.