Alandi News : महिला पोलिसामसवेत गैरवर्तन करत विनयभंग करणारे अटकेत

एमपीसी न्यूज – कर्तव्यावर असताना  महिला पोलिसासोबत गैरवर्तन करून विनयभंग करणाऱ्या दोघांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे.(Alandi News) ही घटना रविवारी (दि. 20) सायंकाळी देहूफाटा चौक आळंदी येथे घडली.

भूषण मनोज जैन (वय 30, रा. घोलपवस्ती, आळंदी), दत्तात्रय रामा कोकरे (वय 23, रा. गोलेगाव, ता. खेड) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 40 वर्षीय पोलीस कर्मचारी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : पुण्याचे सेलेब्रेटी रोड अन त्यावरील वाहतूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूफाटा चौकातून आळंदी बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता यात्रेच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला होता. कोणत्याही वाहनांना त्या रस्त्याने जाण्यास बंदी घालण्यात आली असता आरोपी त्यांची दुचाकी त्या रस्त्याने घेऊन जात होते.(Alandi News) त्यामुळे तिथे कर्तव्यावर असलेल्या फिर्यादी पोलीस कर्मचारी महिलेने दोघांना अडवले. त्यावरून आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून फिर्यादी सोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी केली. एक पोलीस अंमलदार हा वाद सोडवत असताना आरोपींनी त्यांना मारहाण करून जखमी केले. पोलिसांना मारहाण करून पळून जाणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.